बीड जिल्हा डेंजर झोनमध्ये:निर्बंध कायम असणार :पहा का आहे
मुंबई -कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी लावण्यात आलेल्या कडक निर्बंधांच्या चौकटीतून (औरंगाबाद), जालना, हिंगोली, लातूर, नांदेड तसेच परभणी मुक्त झाले आहेत. या जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्क्यांच्या खाली आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र बीड व (उस्मानाबाद) जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्क्यांपेक्षा जास्त असल्यामुळे हे दोन्ही जिल्हे डेंजर झोनमध्येच असून येथील निर्बंध कायम असणार आहेत.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले होते. दुसरी लाट क्षीण झाल्यामुळे राज्य सरकारने निर्बंध शिथिल करण्यात येत असून जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड 25 टक्क्यांपेक्षा कमी भरलेले हा त्यासाठी निकष ठरवण्यात आला आहे.
प्रत्येक आठवड्याला या निकषानुसार यादी जाहीर करण्यात येत आहे. ज्या जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्क्यांच्या आत आहे तेथील निर्बंध पूर्णपणे हटवण्यास परवानगी आहे, मात्र पाच पेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी रेट असेल तर तो जिल्हा डेंजर झोनमध्येच ठेवण्यात येतो. राज्य सरकारने पुढील आठवड्याची यादी जाहीर केली असून त्यानुसार मराठवाड्यातील (औरंगाबाद)जालना, परभणी, नांदेड, हिंगोली तसेच लातूर येथील हे जिल्हे निर्बंधमुक्त होणार आहेत. बीड व (उस्मानाबाद) जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट निकषापेक्षा जास्त असल्यामुळे येथे निर्बंध कायम असणार आहेत.
काय सुरू होणार
सर्व प्रकारची दुकाने.
मॉल्स, थिएटर, मल्टिपेक्स, नाट्यगृहे.
रेस्टॉरंट, हॉटेल्स.
सार्वजनिक ठिकाणे, मैदाने खुली
खासगी कार्यालये उघडणार
शासकीय कार्यालये 100 टक्के उपस्थिती
लग्न, अंत्यविधी, बैठकांना बंधन नाही.
जीम, सलून, ब्युटीपार्लर, स्पा सुरू होणार.
जमावबंदी उठवण्यात येणार.
पॉझिटिव्हिटी रेट
(औरंगाबाद) – 2.94 टक्के
जालना – 1.51 टक्के
हिंगोली – 1.93 टक्के
लातूर – 2.55 टक्के
नांदेड – 1.94 टक्के
परभणी – 0.94 टक्के
बीड – 7.11 टक्के
उस्मानाबाद) – 5.21 टक्के
जिल्हा संख्या मृत्यू
औरंगाबाद 130 05
जालना 32 03
परभणी 49 01
नांदेड 26 01
हिंगोली 08 00
बीड 156 04
लातूर 39 04
(उस्मानाबाद)141 02
एकूण 581 20