Whatsapp मध्ये आले अनेक नवीन फीचर, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्लीः Whatsapp आपल्या युजर्ससाठी अनेक जबरदस्त फीचर्स घेऊन आले आहे. यात अॅनिमेटेड स्टिकर्स, व्हॉट्सअॅप वेबसाठी डार्क मोड, क्यूआर कोड्स, KaiOS साठी स्टेट्सचा समावेश आहे. नवीन अपडेटमध्ये कंपनीने ग्रुप व्हिडिओ कॉलिंग आधीच्या तुलनेत अधिक चांगली केली आहे. व्हॉट्सअॅपवर सर्व नवीन फीचर सर्व युजर्ससाठी रोलआऊट करण्यात आले आहे. हे सर्व काही आठवड्यात भारतात उपलब्ध होतील.
व्हॉट्सअॅप अॅनिमेटेड स्टिकर्स
व्हॉट्सअॅप स्टिकर्सचा वापर युजर मोठ्या प्रमाणात करीत आहेत. परंतु, नवीन अॅनिमेटेड स्टिकर्स सोबत कंपनी युजर्सच्या चॅटिंगचा अनुभव अधिक चांगला करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. नवीन स्टिकर्स आल्याने युजर्स आपल्या फ्रेंड्सला आणि कुटुंबातील सदस्यांसोबत आणखी चांगले कनेक्ट होऊ शकतात. नवीन स्टिकर्स रोल आऊट करण्यासासंबंधी व्हॉट्सअॅप कंपनीने म्हटले, व्हॉट्सअॅप स्टिकर्स एक दुसऱ्याला कम्यूनिकेट करुन खूप प्रसिद्ध होत आहेत. सध्या जगभरात रोज अब्जो स्टिकर्स पाठवले जात आहेत. यावेळी आम्ही अॅनिमेटेड स्टिकर्स पॅक रोलआऊट करीत आहोत. कारण, यामुळे चॅटिंगची मजा आणखी मजेदार होईल.
QR कोड्स
स्टिकर्ससोबत व्हॉट्सअॅपने QR कोड्स फीचरची घोषणा केली आहे. या फीचरच्या मदतीने युजर्स नवीन कॉन्टॅक्ट अॅड करणे अधिक सोपे होईल. आता युजर सेंडरला पाठवलेल्या क्यूआर कोडला स्कॅन आपल्या कॉन्टॅक्टमध्ये जोडू शकतील.
वेबसाठी आले डार्क मोड
या वर्षाच्या सुरुवातीला व्हॉट्सअॅपने आपल्या मोबाइल अॅपसाठी डार्क मोड लाँच केले होते. आता कंपनी डार्क मोडला वेब युजर्ससाठी आणले आहे. व्हॉट्असअॅपला लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर वापरता येईल. हे फीचर काही दिवसात सर्व युजर्संना वापरता येईल.
मजेदार झाली ग्रुप कॉलिंग
व्हॉट्सअॅपने नुकतीच ग्रुप व्हिडिओ कॉल मेंबर्सची संख्या चारवरून आठ केली होती. आता कंपनीने व्हिडिओ कॉलिंग फीचर आणखी चांगले बनवण्यसााठी प्रयत्न सुरू केले आहेत. युजर्स आता ग्रुप व्हिडिओ कॉलिंग दरम्यान त्या युजर्सला फुल स्क्रीनवर पाहू शकेल. ज्यावर फोकस करायचा आहे. यासाठी युजरला त्या युजरच्या व्हिडिओल थोडे प्रेस करावे लागेल. त्यानंतर ते फुल स्क्रीनवर पाहता येईल.
KaisOS ला मिळाले स्टेट्स अपडेट फीचर
कंपनीने KaisOS युजर्ससाठी एक स्टेट्स उपलब्ध करून दिले आहे. आता KaisOS युजर अँड्रॉयड आणि iOS युजर्सला स्टेट्स अपडेट करु शकतील. हे स्टेट्स २४ तासांनंतर डिलीट होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!