बीड जिल्ह्यात आज 154 पॉझिटिव्ह रुग्ण:राज्यात 10 हजार 442 तर देशात 70 हजार 421
बीड जिल्ह्यात आज दि 14 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 2217 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 154 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 2063 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात अंबाजोगाई 9 आष्टी 59 बीड 14 धारूर 5 गेवराई 11 केज 22 माजलगाव 4 परळी 1 पाटोदा 2 शिरूर 20 वडवणी 7 असे रुग्ण आढळून आले आहेत.
दिवसभरात १० हजार ४४२ नवीन रुग्णांचे निदान.
मुंबई: नवीन करोना बाधित रुग्णांची संख्या अधिक आणि बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी, अशी स्थिती गेले काही दिवस राज्यात दिसत आहे. आजच्या आकडेवारीतही ही बाब दिसून आली. आज १० हजार ४४२ नवीन रुग्णांची नोंद झाली तर ७ हजार ५०४ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले. त्यातही चिंता वाढवणारी बाब म्हणजे गेल्या २४ तासांत राज्यात ४८३ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात करोना संसर्गाच्या विळख्यात सापडलेल्या १ लाख ११ हजार १०४ रुग्णांना आतापर्यंत जीव गमवावा लागला आहे.
करोनाची आजची स्थिती
- राज्यात आज ४८३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील करोना मृत्यूदर १.८८ टक्के एवढा.
- आज दिवसभरात १० हजार ४४२ नवीन रुग्णांचे निदान.
- ७ हजार ५०४ रुग्ण आज करोनावर मात करून परतले घरी.
- आतापर्यंत एकूण ५६,३९,२७१ करोना बाधित रुग्ण झाले बरे.
- राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.४४ % एवढे.
- अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ५५ हजार ५८८ पर्यंत घटली.
आनंदाची बातमी! देशातील अॅक्टिव्ह कोविड रुग्णांची संख्या १० लाखांहून कमी
सोमवारी सकाळी आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात रविवारी (१३ जून २०२१) ७० हजार ४२१ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. गेल्या ७२ दिवसांतील ही सर्वात कमी संख्या आहे. देशाचा पॉझिटिव्हिटी दर ४.७१ टक्के आहे. सलग सातव्या दिवशी हा दर पाच टक्यांच्या खाली आहे.
दरम्यान, गेल्या २४ तासांत करोनामुळे ३९२१ जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी १ लाख १९ हजार ५०१ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलीय.
देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २ कोटी ९५ लाख १० हजार ४१० वर पोहचलीय. देशात आत्तापर्यंत २ कोटी ८१ लाख ६२ हजार ९४७ रुग्ण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरलेत. तर सध्या ९ लाख ७३ हजार १५८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर देशातील मृतांची एकूण संख्या ३ लाख ७४ हजार ३०५ वर पोहचलीय.
एकूण करोना संक्रमित रुग्णांची संख्या : २ कोटी ९५ लाख १० हजार ४१०
एकूण बरे झालेली रुग्णसंख्या : २ कोटी ८१ लाख ६२ हजार ९४७
उपचार सुरू : ९ लाख ७३ हजार १५८
एकूण मृत्यू : ३ लाख ७४ हजार ३०५
करोना लसीचे डोस दिले गेले : २५ कोटी ४८ लाख ४९ हजार ३०१