औरंगाबाद

औरंगाबादेत आज 28 रुग्णांची वाढ, जिल्ह्यात कोरोनाबाधित संख्या 1276

मराठवाड्यात आढळले 59 नवे रुग्ण
औरंगाबाद. औरंगाबाद जिल्ह्यात आज 28 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1276 झाली असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.
औरंगाबाद शहरामध्ये आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे
न्याय नगर, गारखेडा (2), टाऊन हॉल (1), सईदा कॉलनी, जटवाडा रोड (3), कैलास नगर (4), राम नगर, एन-2, सिडको (4), नारळीबाग (1), गौतम नगर, जालना रोड (1), संभाजी कॉलनी, सिडको (1), महेश नगर (1), जुना बाजार (1), एमजीएम परिसर (1), भवानी नगर, जुना मोंढा (1), शंकुतला नगर, शहानूरवाडी (1), औरंगपुरा (2), आशियाद कॉलनी, बीड बायपास (1), वडगाव कोल्हाटी (2), अब्दाशहा नगर,सिल्लोड (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 13 महिला आणि 15 पुरूष रुग्णांचा समावेश आहे.
शहरात शनिवारी ३० नवे रुग्ण सापडले. एकूण रुग्णांची संख्या १२४८ वर पोहोचली. १३ मेनंतर पहिल्यांदाच रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. शनिवारी किराडपुऱ्यातील ७५ वर्षीय व सिटी चौकातील ७२ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. मृतांची संख्या आता ४८ वर पोहोचली आहे. शहरातील औरंगपुरा, राजाबाजार व केसापूर भागातही कोरोनाचे रुग्ण आढळले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *