बीडच्या आर्यन कुटेच्या व्हिडीओ गेमची थायलंडमध्ये धूम
बीड (प्रतिनिधी)ः- सध्या जगभर व्हिडीओ गेमचे क्षेत्र आव्हानात्मक बनलेले असतांनाच बीड जिल्हाचा भूमिपूत्र असलेल्या आणि अत्यंत कमी वयात ओएओ ग्रुप या कंपनीची स्थापना केलेल्या आर्यन कुटे यांनी बनविलेल्या ‘राइज ऑफ वॉर’ या व्हिडीओ गेमची सध्या थायलंडमध्ये धूम सुरू आहे. लवकरच हा गेम भारतात आणि जगभरात लाँच करण्यात येणार असल्याचे आर्यन कुटे यांनी म्हटले आहे. आर्यन हा तिरूमला ग्रुपच्या कुटे दाम्पत्याचा मुलगा आहे.
तिरूमला ग्रुपचे सुरेश कुटे आणि अर्चना कुटे यांचा मुलगा आर्यनने ओएओ या नावाने कंपनी स्थापन केली असून ही कंपनी व्हिडीओ गेम निर्मितीच्या क्षेत्रात काम करते. या कंपनीचे ‘कृष्णा माखन मस्ती’ आणि ‘इंडियन फूड बॅश’ हे व्हिडीओ गेम लोकप्रिय आहेत. आता या ग्रुपच्या वतीने आर्यन कुटे यांनी ‘राईज ऑफ वॉर’ हा व्हिडीओ गेम थायलंडमध्ये लाँच केला आहे. लवकरच हा गेम भारतात आणि जगात लाँच केला जाणार असून त्याला गेमप्रेमींनी सहकार्य करावे असे आवाहन आर्यन कुटे आणि तिरूमला ग्रुपच्या एमडी अर्चना कुटे यांनी केले आहे.