पॉजिटीव्ह रुग्णातील एकाचेही वास्तव्य बीड जिल्ह्यातील नाही
बीड/प्रतिनिधी
कोरोणाचा प्रादुर्भाव सुरू झाला आणि बघता बघता शहरात आणि गावात त्याने शिरकाव केला एवढे सगळे होत असताना बीड जिल्हा मात्र कडक शिस्तीने लॉक डाऊन चे नियम पाळत होता जिल्ह्यात असणारा कुठलाही व्यक्ती पॉझिटिव आढळून आला नाही हे बीड जिल्ह्याचे सुदैव आहे आतापर्यंत आढळून आलेले सर्व रुग्ण हे बाहेर गावातून आलेले आढळून आले आहे त्यामुळे बीड जिल्ह्यातील एकही रुग्ण पॉझिटिव्ह नाही हे मात्र नक्की
देशात आणि राज्यात लॉक डाऊन सुरू झाला आणि बीड जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाने अत्यंत सतर्कतेने काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले जिल्ह्यातील जनतेनेही प्रशासनाच्या सूचना लक्षात घेऊन कोरोना चा मुकाबला करण्यासाठी स्वतःला घरात बंद करून घेत दोन महिन्यापासून लॉक डाऊनचा सामना करत असताना कोणी स्वतःचा व्यापार बंद केला तर कोणी स्वतःच्या पोटाला चिंमटा देेेत अनेक लोकांचे व्यवहार बंद पडले कुटुंबात दोन वेळ खाण्याची भ्रांत सुरू झाली तरीसुद्धा बीडची जनता मागे हटली नाही मात्र काही दिवसापूर्वी बाहेर गावातून शहरात आणि गावागावात येणारी मंडळी कुठलीही तपासणी न करता आणि चोर मार्गाने घुसून आपल्या घरात आणि गावात पोहोचले सध्या परिस्थिती आढळून येत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण हे सगळे बाहेर गावातून आलेले आढळून येऊ लागले आहेत स्थानिक म्हणून बीड जिल्ह्यातील एकाही व्यक्तीला कोरोना ची लागण झालेली नाही त्यामुळे बाहेर गावातून आलेल्या सर्वच लोकांचा पुन्हा एकदा सर्वे करून त्यांना तातडीने कोरंटाईन करून त्यांच्या तपासण्या करणे गरजेचे आहे तसेच जे जे लोक बाहेर गावातून आलेले आहेत त्यांनी स्वतःला होणारा त्रास किंवा लक्षणे आढळून येत असतील तर तातडीने आरोग्य प्रशासनाकडे जायला हवे अन्यथा स्वतःबरोबर स्वतःच्या घराला देखील ही पीडा लागेल