औरंगाबाद जिल्ह्यात आज 23 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण

औरंगाबाद : जिल्ह्यात  23 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या आता 1 हजार 241 वर पोहचली आहे. जिल्हा प्रशासनाकडून ही माहिती देण्यात आलेली आहे.   मुंबई, पुणे पाठोपाठ औरंगाबाद जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या गेल्या काही दिवसांमध्ये झपाट्याने वाढली आहे व दररोज रुग्ण संख्येत अधिकच भर पडत आहे.

शुक्रवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये सहा महिला व 17 पुरूषांचा समावेश आहे. शहरातील सादाफ नगर, रेहमानिया कॉलनी, महेमूदपुरा, औरंगपुरा, एन-8, एन-4,गणेश नगर, ठाकरे नगर, एऩ-2, न्यायनगर, बायजीपुरा, पुंडलिक नगर, बजरंग चौक, एन-7, एमजीएम परिसर, एन-5 सिडको, एऩ-12, हडको, पहाडसिंगपुरा, भवानी नगर व गंगापूर तालुक्यातील वडगाव कोल्हाटी या भागातील रुग्ण आढळले आहेत.

करोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा गेल्या सात दिवसातील औरंगाबादचा दर १०.४३ असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ३८.१४ एवढे आहे. करोनाबाधितांच्या मृत्यूचा दरही सध्या ३.३४ एवढा आहे. १५ मार्च रोजी औरंगाबाद येथे विदेशातून आलेल्या एका महिलेला करोनाची बाधा झाली होती. त्यानंतर एप्रिल महिन्यापासून करोनाबाधितांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!