लॉकडाऊनचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री जाहीर करतील-आरोग्यमंत्री टोपे
लॉकडाऊन वाढवण्याचा कल मंत्रिमंडळात दिसून आला. लॉकडाऊन किमान 15 दिवस वाढवण्यावर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. मुख्यमंत्री अंतिम निर्णय जाहीर करतील असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. लोकल ट्रेन निर्बंध कायम राहतील. 15 तारखेपर्यंत तसा निर्णय होईल.
राज्यातील काही जिल्ह्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचं पहायला मिळत आहे. मात्र, असे असतानाही काही जिल्ह्यांच्या ग्रामीण भागात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. यामुळेच राज्यातील लॉकडाऊन पुन्हा एकदा वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेण्यावर मंत्रिमंडळात चर्चा झाली. सध्या ब्रेक द चेन अंतर्गत लागू करण्यात आलेले निर्बंध हे 15 मे पर्यंत कायम होते त्यानंतर आता हे निर्बंध वाढवून 31 मे पर्यंत कायम ठेवण्याची मागणी मंत्र्यांनी बैठकीत केली आहे याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाहीर करतील असे मंत्री टोपे म्हणाले