कोरोनावरील उपचार घेवून घरी आलेले बीडचे कारागृह अधीक्षक संजय कांबळेंचे निधन


बीड, दि.४ (प्रतिनिधी)- बीड जिल्हा कारागृहाचे अधीक्षक संजय कांबळे यांचे बुधवारी पहाटे निधन झाले. काही दिवसापूर्वी ते कोरोना पॉझिटिव्ह आले होते. बीडच्या खासगी रूग्णालयामध्ये उपचार घेत होते.मंगळवारी ते उपचार घेवून घरी परतले असता बुधवारी पहाटे त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने बीडमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
बीडचे जिल्हा कारागृह अधीक्षक संजय कांबळे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर बीडच्या खासगी रूग्णालयामध्ये उपचार सुरू होते. मंगळवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. बुधवारी पहाटे त्यांचे निधन झाले. या घटनेने बीडमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांच्याकडे  पाहिल्या जायचे. मुळचे शिक्षक असलेले कांबळे या आधी मुंबईला असताना तिहार जेलची जबाबदारी त्यांच्याकडे होती. कुख्यात दहशतवादी कसाब आणि दहशतवाद्यांच्या बराकीच्या सुरक्षेची त्यांनी जबाबदारी पार पाडली होती. अगदी कमी वयामध्ये बीडमध्ये त्यांनी आपली छाप टाकली होती. कारागृहाबाबत सामान्य जनतेची मानसिकता बदलणारा अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जायचे.


error: Content is protected !!