बीड जिल्ह्यात आज 703 पॉझिटिव्ह:अंबाजोगाई 239 आष्टी 90,बीड 112
बीड जिल्ह्यात आज दि 12 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 4858 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 703 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 4155 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
अंबाजोगाई 239 आष्टी 90 बीड 112 धारूर 10 गेवराई 25 केज 55 माजलगाव 19 परळी 68 पाटोदा 12 शिरूर 62 वडवणी 11
जिल्ह्यात आज 479 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून बीड जिल्ह्यात सध्या 3815 रुग्ण उपचार घेत आहेत तर 1536 बेड सध्या उपलब्ध आहेत एकूण 5351 बेडची व्यवस्था करण्यात आली असून 64 ठिकाणी कोरोना रुग्णांना दाखल करण्याची व्यवस्था आरोग्य प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे बीड जिल्ह्याची एकूण बाधित संख्या 33 हजार 43 इतकी झाली असून आत्तापर्यंत 714 जणांचा मृत्यू झाला आहे सध्या एकूण कोरोना मुक्त रुग्णांची संख्या 28 हजार 514 इतकी आहे
मुंबई: राज्यात नव्या करोना बाधित रुग्णांचा आकड्यात कालच्या तुलनेत पुन्हा वाढ झाली असून कालची रुग्णवाढही चिंतेत भर घालणारी आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ६३ हजार २९४ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. काल ही संख्या ५५ हजार ४११ इतकी होती. कालच्या तुलनेत मोठी झाली असून ही वाढ ७ हजार ८८३ ने अधिक आहे. या बरोबरच, गेल्या २४ तासांमध्ये एकूण ३४ हजार ००८ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. काल ही संख्या ५३ हजार ००५ इतकी होती. याबरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ५ लाख ६५ हजार ५८७ वर जाऊन पोहचली आहे
राज्यात एकूण ३४९ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ही संख्या ३२२ इतकी होती. सध्या राज्यातील मृत्यूदर १.७ टक्के इतका आहे. याबरोब राज्यात आज ३४ हजार ००८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत एकूण २७ लाख ८२ हजार १६१ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.६५ टक्क्यांवर आले आहे.
गेल्या २४ तासांत देशातील रुग्णवाढ नव्या शिखरावर पोहोचली आहे. देशात करोनाचा प्रवेश झाल्यापासूनचा सर्वाधिक आकडा आहे. तसेच कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्याही २४ तासांत वाढली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेली ही आकडेवारी सरकार आणि आरोग्य व्यवस्थेची झोप उडवणारी आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गेल्या २४ तासांत झालेली रुग्णवाढ आणि मृत्यूची संख्या जाहीर केली आहे. रविवारी नोंदवण्यात आली रुग्णसंख्या ही आतापर्यंतची सर्वात मोठी रुग्णवाढ ठरली आहे.
२४ तासांत १ लाख ६८ हजार ९१२ करोना बाधित आढळून आले असून, याच कालावधीत देशात ९०४ कोविड रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ७५ हजार ८६ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. देशातील एकूण मृतांची संख्याही १ लाख ७० १७९ इतकी झाली असून, एकूण रुग्णसंख्या १,३५,२७,७१७ वर पोहोचली आहे.