बीड

बीड जिल्ह्यात आज 764 पॉझिटिव्ह:अंबाजोगाई 146 आष्टी 123,बीड 141

बीड जिल्ह्यात आज दि 10 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 6140जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 764 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 5376 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

अंबाजोगाई 143 आष्टी 123 बीड 141 धारूर 29 गेवराई 60 केज 71 माजलगाव 73 परळी 59 पाटोदा 25 शिरूर 26 वडवणी 14

राज्यात दि 9 रोजी ५८,९९३ नव्या रुग्णांचे निदान

गेल्या २४ तासांत राज्यात ५८ हजार ९९३ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. काल ही संख्या ५६ हजार २८६ इतकी होती. कालच्या तुलनेत काहीशी वाढ झाली असून ही संख्या २ हजार ७०७ ने अधिक आहे, ही चिंता वाढवणारी बाब आहे. या बरोबरच, गेल्या २४ तासांमध्ये एकूण ४५ हजार ३९१ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. परवा ही संख्या ३६ हजार १३० इतकी होती. याबरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ५ लाख ३४ हजार ६०३ वर जाऊन पोहचली आहे.

काल राज्यात एकूण ३०१ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ही संख्या ३७६ इतकी होती. सध्या राज्यातील मृत्यूदर १.७४ टक्के इतका आहे. याबरोबर राज्यात ४५ हजार ३९१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत एकूण २६ लाख ९५ हजार १४८ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.९६ टक्क्यांवर खाली आले आहे.

देशभरात 780 जणांचा मृत्यू

देशात लागोपाठ तिसर्‍या दिवशी कोरोनाचे लाखावर नवे रुग्ण आढळले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासांत 1.31 लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळले आहेत. याच कालावधीत देशभरात 780 जणांचा मृत्यू झाला आहे. मागील वर्षी 12 सप्टेंबर रोजी 1201 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. मात्र, शुक्रवारचा 780 रुग्णांचा मृत्यू हा यंदाचा उच्चांक आहे.
कोरोना महामारी देशात सुरू झाली तेव्हापासूनचा हा सर्वांत मोठा दैनंदिन आकडा आहे. आता दररोज जुने उच्चांक मोडीत निघत आहेत. याआधी बुधवारी 1.26 लाखांहून अधिक रुग्ण आढळले होते. मंगळवारी 1.15 लाखांहून अधिक नवे रुग्ण समोर आले होते. गेल्या 24 तासांत 61 हजार 899 रुग्ण कोरोनामुक्तही झाले आहेत.