बीड

बीड जिल्ह्यात आज 580 कोरोना पॉझिटिव्ह:अंबाजोगाई 114,बीड 146

बीड जिल्ह्यात आज दि 7 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 3529 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 580 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 2949 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

अंबाजोगाई 114 आष्टी 71 बीड 146 धारूर 15 गेवराई 36 केज 50 माजलगाव 39 परळी 60 पाटोदा 18 शिरूर 21 वडवणी 10

काल दि 6 रोजी 361 जण कोरोना मुक्त होऊन घरी गेले त्यांना बरे झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला तर दुर्दैवाने एकाच दिवशी 10 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे,कोरोना रुग्ण वाढ लक्षात घेऊन आणखी 5 कोविड सेंटर तयार करण्यात आले आहेत,46 ऐवजी आता 51 ठिकाणी रुग्णांवर उपचार करण्याची व्यवस्था झाली आहे,सध्या 837 बेड शिल्लक आहेत तर 2383 रुग्ण उपचार घेत आहेत

गेल्या 24 तासात राज्यात तब्बल 55 हजार 469 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. ही आजवरची राज्यातील सर्वाधिक एकदिवसीय रुग्णवाढ आहे.
राज्यात आज 297 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला, आजवर एकूण 56 हजार 330 जण कोरोनामुक्त मुत्यूमुखी पडले आहेत.
राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.86 टक्के एवढा आहे.

देशातील कोरोना रुग्‍णवाढीची भयावह स्‍थिती आजही कायम राहिली. गेल्या २४ तासांमध्‍ये तब्बल ९६ हजार ९८२ नवे रुग्ण आढळले. तर, ४४६ जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, ५० हजार १४३ रुग्णांनी कोरोनावर मात केली. देशात सध्‍या ७ लाख ८८ हजार २२३ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत देशभरात १ लाख ६५ हजार ५४७ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला, अशी माहिती आरोग्‍य मंत्रालयाने दिली.