बीड

बीड जिल्ह्यात 46 कोविड सेंटरवर 2100 च्यावर कोरोना रुग्णांवर उपचार

बीड-जिल्ह्यात एक महिन्यापूर्वी दोनशे ते तीनशे रुग्ण उपचार घेत होते,आता मात्र 46 ठिकाणी 2171 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागातून देण्यात आली आहे तर आज बरे झालेल्या 251 रुणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे

बीड जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे,नुकताच 10 दिवसाचा लॉक डाऊन देखील पाळण्यात आला मात्र तरीही रुग्ण संख्या आटोक्यात येण्या ऐवजी ती वाढतच गेली आहे,गेल्या महिन्यात जिल्ह्यात अत्यंत कमी रुग्णांवर उपचार सुरू होते आता ही संख्या 2171 वर पोहचली आहे आजच दि 5 रोजी 575 रुग्ण आढळून आले आहेत,हा आकडा चिंतेचाच आहे,जिल्ह्यात सध्या 46 कोविड सेंटरवर या रुग्णांवर उपचार सुरू आहेत जिल्ह्यात 3833 बेड असून आता 822 बेड शिल्लक आहेत

शासकीय आणि खासगी रुग्णालयात या बेड उपलब्ध करण्यात आल्या आहेत
बीड जिल्ह्यात 27,775 पॉझिटिव्ह रुग्ण संख्या झाली असून यात 24,942 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत तर आतापर्यत 662 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे,जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट 9.79%तर 2.39% मृत्यूचे प्रमाण असल्याची नोंद करण्यात आली आहे