लाल परी मैदान खडी जिल्हा अंतर्गत लालपरीचा प्रवास सुरु होणार
प्रत्येक तासाला तालुक्याच्या ठिकाणी सेवा
बीड ते अंबाजोगाई , माजलगाव धारूर, आष्टी पाटोदा धारूर केज वडवणी आदी तालुक्यांमध्ये ही सेवा राहणार असून तालुका अंतर्गतही सेवा सुरू करण्यात आली आहे.
शासनाच्या आदेशानुसार एसटी महामंडळाची सेवा आजपासून सुरू होत आहे असं क्षमतेच्या 50% प्रवासी महामंडळाच्या बस मधून प्रवास करू शकणार असल्याची माहिती विभाग नियंत्रकांनी दिली आहे
गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील लाल परी जागेवरच उभी होती मात्र शासनाने 22 मे पासून काही सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार बीड जिल्ह्यात जिल्हा अंतर्गत बस सेवा सुरू राहणार असून असं क्षमतेच्या 50% प्रवासी बस मधून प्रवास करू शकणार आहेत. गेल्या तीन दिवसापासून जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना शासनाच्या निर्णयानुसार आता बस सेवा सुरू होणार असल्याने जे तालुके आजपर्यंत मनापासून सुरक्षित होते या बस सेवेमुळे तालुक्यात रुग्णांची संख्या वाढणार तर नाही ना असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून जिल्हा अंतर्गत अडकून राहिलेल्या प्रवाशांना मात्र या सेवेमुळे आपल्या घरी परतण्याचा मार्ग मोकळा होणार आहे शुक्रवार दिनांक 22 पासून जिल्ह्यातील सर्व बस स्थानका मधून बस सेवा सुरू होणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक यांच्यावतीने देण्यात आली आहे.