चार व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

पुणे – राज्य सीईटी सेलने मास्टर ऑफ कॅम्प्युटर सायन्स (एमसीए), बॅचरल ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ऍण्ड केटरिंग टेक्‍नॉलॉजी, मास्टर ऑफ आर्किटेक्‍चर आणि मास्टर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ऍण्ड केटरिंग टेक्‍नॉलॉजी या चार व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे.

राज्य सीईटी सेलकडून या चारही अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया राबविली जाते. करोना विषाणूच्या संसर्गाची परिस्थिती लक्षात घेता सीईटी सेलने मार्च महिन्यात सर्व प्रकारच्या परीक्षांना स्थगिती दिलेली होती. एमसीए अभ्यासक्रमाची सीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. आता एमसीए सीईटी बरोबर हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्‍नोलॉजी (बीएचएमसीटी) एम. आर्किटेक्‍चर, एम.एचएमसीटी या सीईटी परीक्षा 19 जुलै रोजी होणार आहे. एमसीए व्यतिरिक्त अन्य सीईटींसाठी विद्यार्थ्यांना 31 मे पर्यंत अर्ज करता येणार आहेत, अशी माहिती राज्य सीईटी सेलचे आयुक्‍त संदीप कदम यांनी दिली आहे.

 ‘एमएचटी-सीईटी’ही जुलै महिन्यात
अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी एमएचटी-सीईटी परीक्षा विविध सत्रांत 4, 6, 7, 8, 9, 10, 13, 14, 28, 29, 30 आणि 31 जुलैला होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना या तारखांना परीक्षा देता आली नाही तर ही परीक्षा 3 ते 5 ऑगस्टला पुन्हा होणार आहे. सीईटीसाठी एकूण 5 लाख 24 हजार 907 विद्यार्थ्यांनी राज्य तसेच राज्याबाहेरील विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!