बीड

आज बीड शहरात 108 तर जिल्ह्यात 265 कोरोना पॉझिटिव्ह

बीड जिल्ह्यात आज दि 20 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 1799 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 265 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1534 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

अंबाजोगाई 85 आष्टी 14 बीड 108 धारूर 5 गेवराई 9 केज 8 माजलगाव 11 परळी 12 पाटोदा 6 शिरूर 2 वडवणी 5

गेल्या २४ तासांत भारतात करोना संक्रमित ३९ हजार ७२६ नव्या रुग्णांची भर पडलीय.

यातील महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत कोरोनाचे 25,833 नवीन रुग्ण नोंदले गेले आणि या काळात 58 लोकांचा मृत्यू झाला आहे.

देशात एकूण रुग्णसंख्या : १ कोटी १५ लाख १४ हजार ३३१
बरे झालेल्या रुग्णांची संख्या : १ कोटी १० लाख ८३ हजार ६७९
उपचार सुरू : २ लाख ७१ हजार २८२
एकूण मृत्यू : १ लाख ५९ हजार ३७०

देशात महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णसंख्या आढळून येतेय. त्यापाठोपाठ सर्वाधिक रुग्णसंख्येच्या बाबतीत केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि दिल्ली या राज्यांचा समावेश आहे.