बीड/प्रतिनिधी
कोव्हीड 19 च्या संकट काळात शांतिवन कम्युनिटी किचन च्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या भोजन सेवेला आज 40 दिवस पुर्ण झाली. आपल्या सर्वांच्या आर्थिक सहयोगातून सुरू झालेला हा सेवेचा महायज्ञ अनेक वंचित, उपेक्षित, ऊसतोडणी कामगार भटके,आदिवासी,परप्रांतीय कामगार, यांची भुक भागविणारा ठरला.गेल्या 40 दिवसात 17 अन्नछत्राच्या माध्यमातून सरासरी 140000 जेवणाची व्यवस्था आपण केली.तर 1200 हून अधिक गरजू परिवारापर्यंत जीवनावश्यक वस्तूंच्या किट आणि बालकांसाठी पोषण आहार पोहोचविला आहे शांतिवन मधील बालकांची जबाबदारी यशस्वी सांभाळून शांतिवननेही मोहीम यशस्वी राबविली आहे.
लॉकडाऊन वाढल्यामुळे आणि बीड मध्ये पेशंट ची वाढती संख्या लक्षात घेता अजून काही दिवस या लोकांना रोजगार मिळणार नाही. म्हणून आणखी काही दिवस आपल्याला हे अन्नछत्र सुरू ठेवावे लागतील.म्हणून तुमच्या सर्वांच्या सहकार्यातून लॉकडाऊन संपेपर्यंत आपण ही मोहीम सुरू ठेऊयात.तुम्ही सर्वजण त्यासाठी निश्चित सहकार्य कराल हा विश्वास आहे.असे दीपक नागरगोजे यांनी सांगितले.