बीड जिल्ह्यात चाचण्या वाढल्या रुग्ण वाढले:आज 108 कोरोना पॉझिटिव्ह
बीड जिल्ह्यात आज दि 6 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 924 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 108 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 816 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
अंबाजोगाई 8 आष्टी 7 बीड 43 गेवराई 21 केज 4 माजलगाव 8 परळी 8 पाटोदा 5 शिरूर 1 वडवणी 3
राज्यातही कोरोनाचा कहर सुरू झाला
मुंबई, 05 मार्च : राज्यातील (Maharashtra coronavirus cases) कोरोनाचा धोका आता दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोनानं वेग (maharashtra coronavirus update) धरला तो आता काही कमी होण्याचं नाव घेत नाही आहे. कोरोनाचा आलेख झपाट्याने वाढत चालला आहे. राज्यातील नव्या कोरोना रुग्णांनी सुरुवातीला 8 हजार, मग 9 हजार आणि आता तर 10 हजारांचा आकडा ओलांडला आहे.
राज्याच्या आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 05 मार्चला दिवसभरात तब्बल 10 हजार 216 रुग्ण सापडले आहेत. तर 53 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सध्या 88,800 पेक्षा जास्त अॅक्टिव्ह म्हणजे उपचार घेत असलेले रुग्ण आहे. अॅक्टिव्ह रुग्णांचा विचार करता पुण्यात सर्वात जास्त रुग्ण आहेत तर त्यापाठोपाठ नागपूर, ठाणे आणि मुंबईचा नंबर लागतो. पुण्यात 18 हजार तर नागपुरात 11 हजारपेक्षा जास्त अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
राज्यातील 05 मार्चची कोरोना रुग्णांची आकडेवारी (Maharashtra total Covid 19 Cases)
एकूण रुग्ण – 21,98,399
उपचार घेत असलेले रुग्ण – 88,838
दिवसभरातील नवे रुग्ण – 10,216
दिवसभरात बरे झालेले रुग्ण – 6,467
एकूण बरे झालेले रुग्ण – 20,55,951
रुग्ण बरे होण्याचं प्रमाण – 93.52%
दिवसभरातील मृत्यू – 53
मृत्यूचं प्रमाण – 2.38%