बीड

बीड शहरातील दोन गल्ल्यामध्ये पूर्णवेळ संचारबंदी -जिल्हाधिकारी राहुल रेखावार

बीड/प्रतिनिधी
बीड शहरात कोरोना विषाणूचे लागण (COVID-१९ Positive) झालेले 5 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे बीड जिल्हयात इतर ठिकाणी कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणुन पुढील
प्रमाणे फौजदारी प्रकिया दंड सहिंता १९७३ चे कलम १४४ नुसार बीड शहरातील मोमीनपूरा,अशोकनगर,जयभवानी नगर,सावता माळी चौक,परिसरात कन्टेनमेंट झोन (Containment zone) म्हणून घोषित करण्यात येत आहे

जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी शहरातील काही भाग कंटेनमेंट , बफर झोन घोषित केला असून या भागात अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू असणार आहे . जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार , शहरातील मोमीनपुरा – अशोकनगर परिसरातील गफुर ईबाहिम मिस्त्री यांच्या घरापासून ते बिलालभाई बर्तनवाले यांच्या घरापर्यंतचा व जयभवानी नगर , सावता माळी चौक परिसरातील बाबुराव मारोती दुधाळ यांच्या घरापासून ते कुंडलिक खांडे यांच्या घरापर्यंत कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केला आहे . या घोषित भागात अनिश्चित काळासाठी पूर्णवेळ संचारबंदी लागू असणार आहे . आदेशाची अवाज्ञा करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार असल्याचे आदेशात म्हटले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *