बीड

व्यापार्‍यांनी बंद मध्ये सहभागी व्हावे-कानगावकर

शुक्रवारच्या भारत व्यापार बंदला बीड आदर्श मार्केट व्यापारी संघटनेचा पाठींबा!

बीड (प्रतिनिधी) केंद्र सरकार जीएसटीच्या माध्यमातून पुन्हा एकदा मागच्या दाराने इन्स्पेक्टर राज आणण्याचा प्रयत्न करत आहे. जीएसटी कायद्यातील जाचक अटी व तरतुदीचा निषेध करत येत्या 26 फेब्रुवारी रोजी भारत व्यापार बंदमध्ये सर्व व्यापारी संघटना सामील झाल्या आहेत. दरम्यान या बंदला बीड आदर्श मार्केट व्यापारी संघटनेने पाठींबा दिला असून व्यापार्‍यांनी शुक्रवारी आपली दुकाने बंद ठेवून बंद यशस्वी करावा असे आवाहन आदर्श मार्केट व्यापारी संघटनेचे अध्यक्ष तथा बीड जिल्हा व्यापारी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाशराव कानगांवकर यांनी केले आहे.


जीएसटी कायद्याचा मसुद्यात असलेल्या जटिल तरतुदी व जाचक अटीच्या विरोधात 26 फेब्रुवारी शुक्रवार रोजी भारत व्यापार बंदचे आवाहन कॉनफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स केले आहे. त्यास बीड शहर व जिल्हा व्यापारी महासंघाचाही पाठींबा असून बीड आदर्श मार्केट व्यापारी संघटनेने देखील या पाठींबा दिला आहे. या भारत व्यापार बंदला देशातील 40 हजार संघटना व 8 करोड व्यापार्यांनी पाठींबा दिला असून हे सर्व व्यापारी आप आपली प्रतिष्ठाने बंद ठेऊन जीएसटीच्या जाचक तरतुदी विरुद्ध लढा पुकारणार आहे.


बीड शहर व जिल्हा व्यापारी महासंघाने भारत व्यापार बंदमध्ये सहभाग घेण्याचे ठरवले असून बीड आदर्श मार्केट व्यापारी संघटनेचाही या भारत व्यापार बंदला पाठींबा असल्याचे प्रसिध्दी पत्रकाद्वारे आदर्श मार्केट व्यापारी संघटनेचे अध्यक्ष तथा बीड जिल्हा व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष प्रकाशराव कानगावकर यांनी केले आहे.