बीड

बीड जिल्ह्यातील लॉकडाऊन कालावधीत दिलेल्या आदेशाचे पालन करा अन्यथा कारवाई

बीड- राज्य शासनाने covid-19 च्या उपाययोजना बाबत नियम क्रमांक 3 नुसार कोरोनाविषाणू मळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण यासाठी जिल्हाधिकारी यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात सक्षम अधिकारी म्हणून घोषित केले आहे त्यानुसार बीड जिल्ह्यात covid-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन चा कालावधी दिनांक 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत वाढवला आहे व लोक डाऊन च्या कालावधीत करावयाच्या कारवाईबाबत कार्यालयाने वेळोवेळी पारित केलेल्या आदेशान्वये मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आले आहेत निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण बीड यांनी आज दिनांक 20 फेब्रुवारी पासूनच पुढील आदेशाचे पालन करण्याची सूचना सर्व विभागातील अधिकाऱ्यांना दिल्या आहेत