बीड जिल्ह्यातील बंधुंनो काळजी घ्या
विनाकारण घराबाहेर पडू नका, काळजी घ्या, प्रशासनाला सहकार्य करा.
मी औरंगाबादमध्ये गेली दोन महिने कोरोणा शहरात कसा वाढत गेला हे डोळ्यान पाहीले आहे व बेशीस्त फिरणारे काही टोळके देखील पाहीले आहे मात्र दहा हात दुरवरुनच… सुरवातीला मीही गांभीर्याने घेतले नाही मात्र चार दिवसांत मला कोरोणाचा विळखा समजु लागला व मी बाहेर पडणे थांबवले.गेले दिड महिना मी ९९.९९ टक्के लॉकडाऊन पाळले आहे व येथिल घडामोडी बीड शहरातील मित्रांना रोज सांगितल्या आहेत.बेशीस्त औरंगाबादमध्ये तो वाढत वाढत एक हजार च्या पुढेही आकडा गेला आहे ,मात्र बीड जिल्ह्यातील जनतेची कुठलीही चुक नसताना मुंबई, पुणेकरांना हवं तेथे जाण्यासाठी मुभा दिली अन् तो जिल्ह्यातील गावागावात पोहचला.काल मी रात्री १ पर्यंत जागाच होतो…तो 8 पॉझिटिव्ह आकडा बीड येथील मित्रांनी कळवला अन्
धस्स झाले… दोन महिने शिस्त पाळलेल्या जिल्ह्यातील जनतेला आज कोरोणाचा सामना करावा लागतो आहे…जर रोज साखळी वाढत गेली तर पुढील दोन महिने खूप काळजी घ्यावी लागणार आहे… कालपर्यंत आपण केलेल्या तपश्र्चर्यावर पाणी फेरले गेले आहे आता नव्याने शिस्त पाळा प्रशासनाला सहकार्य करा…साखळी तोडा.. कुठलेही राजकीय लोक तुमच्या मदतीला धावून येतात नादीत, हेवेदावे विसरून शिस्त पाळा.. शेजारच्या घरात नवीन कोणी आले असेल तर हात जोडून तपासणी करावयास भाग पाडा.. ग्रामीण भागात कोण नविन आले हे तात्काळ कळेल मात्र मोठ्या शहरात ते अवघड आहे,बाकी फार सल्ले देत नाही कारणं औरंगाबाद शहरात पेशंट वाढले ग्रामीण भागात नाही,..बीड ग्रामीण भागात पेशंट वाढत आहेत हे निश्चितच चिंतेचा विषय आहे कारण औरंगाबादमध्ये सर्व सुखसोयी उपलब्ध असुनही रुग्ण उपचारासाठी घाबरत आहेत, बीड जिल्ह्यात तेवढ्या सोयी नाहीत. नेहमी उपचारासाठी औरंगाबाद, पुणे, मुंबई येथे आता जाता येणार नाही त्यासाठी तुम्ही १०० टक्के नियम पाळले तर तुम्ही कोरोणावर मात करु शकाल…
विनाकारण घराबाहेर पडू नका, काळजी घ्या, प्रशासनाला सहकार्य करा.
सदैव तुमचा
प्रमोद ठोसर मूळ राहनार बीड