कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी अधिकाऱ्यांनी सतर्क राहावे-खा ओमराजे निंबाळकर
भूम येथे उपविभागीय कार्यालयात घेतली आढावा बैठक
उस्मानाबाद /प्रतिनिधी
उपविभागीय कार्यालय, भूम येथे तालुक्यात कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने सद्य स्थितीचा आढावा बैठक घेण्यात आली.यावेळी खा ओमराजे निंबाळकर यांनी अधिकाऱ्यांनी या कोरोनाच्या काळात मुकाबला करण्यासाठी सतर्क राहून नियोजनबद्ध अंमलबजावणी करावी अशा सूचना दिल्या
भूम तालुक्यातील बरेच लोक हे आपल्या स्वगृही परतत आहेत अशा व्यक्तींची प्रशासनाने नोंद घेऊन त्यांची प्रशासनाने अशा नागरिकांना योग्य माहिती देऊन त्यांना शक्यतो इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात यावे. तसेच तालुक्यात इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यासाठी ठिकाणे निवड करून सुयोग्य नियोजन करण्यात यावे.तालुक्यातील पन्हाळवाडी सह 4 गावच्या सिमा सिल करण्यात आल्या आहेत. या गावांनमध्ये सकाळ संध्याकाळी फवारणी करावी. सॅनिटायझर, मास्क चे वाटप करावे. तसेच प्रतिबंधित क्षेत्रातून बाहेर जाण्याऱ्या व आत येणाऱ्या व्यक्तींची यादी तयार करण्यात यावी, या झोनमधील लोक कामाशिवाय बाहेर जाता कामा नये. अशा सूचना खा निंबाळकर यांनी संबंधित अधिकारी यांना दिल्या.
यावेळी जि.प. उपाध्यक्ष धनंजय सावंत, भूम न.प गटनेते संजय नाना गाढवे, उपविभागीय अधिकारी सौ मनिषा राशिनकर मॅडम, तहसीलदार सौ. उषाकिरण श्रुंगारे मॅडम, ग्रामविकास अधिकारी श्री.राजू कांबळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदिप शिनगारे, पोलिस उपनिरीक्षक श्री. साळवे, युवासेना जिल्हा युवाधिकारी डॉ. चेतन बोराडे, सरपंच, तलाठी, ग्रामसेवक आदी संबंधित अधिकारी उपस्थित होते.