ऑनलाइन वृत्तसेवामहाराष्ट्रमुंबई

राज्यातील लॉकडाऊन पुन्हा वाढला; ‘या’ तारखेपर्यंत निर्बंध कायम

मुंबई: करोनाचे संकट अद्याप पूर्णपणे टळलेले नसल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं सध्या सुरू असलेला लॉकडाऊन २८ फेब्रुवारीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कंटेनमेंट झोनमध्ये सध्या असलेले निर्बंध कायम राहणार आहेत. या संदर्भात राज्य सरकारनं आज नवा आदेश काढला आहे.

राज्यात आत्तापर्यंत मिशन बिगिन अगेन अंतर्गंत अनेक निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. आतापर्यंत ज्या सवलती देण्यात आल्या आहेत त्या या पुढेही कायम ठेवतानाच कंटेन्मेंट झोनमधील लॉकडाऊन २८ फेब्रुवारीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच, लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करण्यात यावं, असंही या आदेशात नमूद करण्यात आलं आहे.
याआधी ३० सप्टेंबर आणि १४ ऑक्टोबरला मिशन बिगीन अगेन अंतर्गंत काही निर्बंध शिथील करत प्रसिद्ध करण्यात आलेल्या गाइडलाइन्स २८ फेब्रुवारीपर्यंत लागू राहतील, असंही या पत्रकात स्पष्ट केलं आहे. तसंच, या आधी परवानगी देण्यात आलेल्या सर्व गोष्टी सुरु राहणार आहेत.