कोरोना अपडेट:बीड जिल्ह्यात आज 43 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
बीड जिल्ह्यात आज दि 29 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 997 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 43 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 954 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
अंबाजोगाई 12 आष्टी 3 बीड 15, गेवराई 1 केज 8 परळी 2 शिरूर 1 वडवणी 1
गुरुवारी राज्यात २,८८९ नवीन काेराेना रुग्णांची नाेंद करण्यात आली आहे. तर आज ३,१८१ रुग्ण बरे हाेवून घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १९.२३,१८७ कराेना बाधित रुग्ण बरे हाेऊन घरी गेले आहेत.ज्यामुळे राज्यातील रुग्ण बरे हाेण्याचे प्रमाण ९५.२८% एवढे झाले आहेत. राज्यात आज ४३,०४८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. मागील आठवड्याभरापासून राज्यात काेराेना रुग्णसंख्या स्थिर असल्याचे आराेग्य विभागाचे म्हणणे आहे.
गुरुवारी देशात बारा हजारांपेक्षा कमी नवे कोरोना रुग्ण सापडले. एक कोटी तीन लाखांपेक्षा अधिक लोक बरे झाले असून, त्यांचे प्रमाण ९६.९४ टक्के आहे. बळींची संख्याही दिवसेंदिवस कमी होत आहे.
केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना रुग्णांची एकूण संख्या १,०७०,११,१९३ झाली असून, त्यातील १,०३,७३,६०६ जण बरे झाले आहेत. गुरुवारी कोरोनामुळे १२३ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे बळींची संख्या १,५३,८४७ झाली आहे. सध्या १,७३,७४० कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असून, त्यांचे प्रमाण १.६२ टक्के आहे. कोरोना रुग्णांचा मृत्युदर १.४४ टक्के आहे.
गुरुवारी १४,३०१ जण या संसर्गातून बरे झाले. देशभरात आतापर्यंत २३,५५,९७९ लोकांना कोरोना लस देण्यात आली. जगभरात कोरोनाचे १० कोटी १४ लाख रुग्ण आहेत. त्यातील सात कोटी ३३ लाख रुग्ण बरे झाले. जगात कोरोनामुळे २१ लाख ८४ हजार लोकांचा बळी गेला.