महाराष्ट्रातील लॉकडाऊनचा देशाच्याअर्थव्यवस्थेवर परिणाम!
नवी दिल्ली- भारतीय अर्थव्यवस्थेचे इंजिन असलेल्या महाराष्ट्रासह काही राज्यातील लॉकडाऊनचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर जास्त परिणाम होणार आहे.
ज्या राज्यातील लॉक डाऊनचा अर्थव्यवस्थेवर जास्त परिणाम होणार आहे त्यामध्ये महाराष्ट्रासह गुजरात, तामिळनाडू या राज्यांचा समावेश आहे. भारतातील आठ राज्यांचा एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा 60 टक्के इतका भरतो. त्यामुळे या राज्यातील लॉक डाऊन लवकरात लवकर कमी होण्याची गरज असल्याचे क्रिसील या पतमानांकन करणाऱ्या संस्थेच्या संशोधन अहवालात म्हटले आहे.यावर्षी भारतीय भारताचे राष्ट्रीय उत्पन्न सर्वसाधारण उत्पन्नापेक्षा पाच टक्क्यांनी कमी होणार आहे. ज्या राज्याचा राष्ट्रीय उत्पन्नाचा वाटत जास्त आहे, त्याच राज्यांमध्ये करोनाव्हायरस जास्त प्रमाणात आढळून आल्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले. महाराष्ट्रातील लॉक डाऊन काल 30 मे पर्यंत वाढविण्यात आले आहे.