जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या बदलीचे आदेश अद्याप तरी नाहीत
बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांची बदली होऊ आर. एस. जगताप नवे जिल्हाधिकारी म्हणून रुजू होणार असल्याचे वृत्त येत असले तरी अद्याप रेखावार यांच्या बदलीचे आदेश प्राप्त नसल्याचे सांगण्यात आले आहे
एक वर्षापूर्वीच जिल्हाधिकारी राहुल रेखावार बीड येथे रुजू झाले आहेत त्यांच्या कार्यकाळात कोरोणा परिस्थितीवर चांगल्या प्रकारचे नियंत्रण ठेवण्यात बीड जिल्ह्याला यश प्राप्त झाले आहे अनेक महत्त्वपूर्ण कामांच्या बाबतीत जिल्हाधिकारी रेखावार यांनी उत्कृष्ट कार्य केल्याचे जिल्ह्याने पाहिले आहे त्याचबरोबर नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुका देखील यशस्वीपणे पार पडल्या आहेत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची बदली करण्यासाठी अनेकांनी देव पाण्यात घातले आहेत आज रेखावर यांची बदली झाल्याचे वृत्त येत असून याबाबत अधिक चौकशी केली असता जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या बदलीचे आदेश अद्याप पर्यंत तरी प्राप्त झालेले नसल्याचे सांगण्यात आले आहे त्यामुळे त्यांची बदली झाली की नाही हे अद्याप तरी स्पष्ट झालेले नाही
रेखावार यांनी आताच सांगितले की,सर्वांनी हे लक्षात घ्यावे की माझा नियुक्ती आदेश अद्याप जारी केलेला नाही. आयुक्त जीएसटी हे एक वरिष्ठ पद आहे जे माझ्या वरिष्ठतेच्या अधिका-यास दिले जाऊ शकत नाही.