महाराष्ट्राचा विकास उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात तर नरेंद्रभाईंचे कार्य प्रशंसनीय-लतादिदींच्या शुभेच्छा

मुंबई, 01 जानेवारी: भारताची सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदींच्या कामाचं कौतुक केलं आहे. याप्रसंगी त्यांनी एक ट्वीट केलं आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, ‘नरेंद्र भाई मोदी तुम्हाला माझा सादर प्रणाम. तुम्ही देशासाठी जे काम करत आहात, ते प्रशंसनीय आहे. मी तुम्हाला नवं वर्षाच्या शुभेच्छा देते आणि तुमच्या आईला प्रणाम करते’ अशा शब्दांत लता मंगेशकर यांनी नरेंद्र मोदी यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

यावेळी त्यांनी ट्वीटमध्ये त्यांनी स्वतः गायलेल्या ‘वंदे मातरम’ गाण्याची लिंकही टाकली होती.
शालेय शिक्षण घेताना स्वातंत्र्यदिनी आणि प्रजास्ताक दिनी लता दीदींच्या आवाजातलं हे देशभक्तीपर गाणं नेहमीच अंगावर शहारं आणायचं. या ट्वीटला प्रतिक्रिया देताना अनेक चाहत्यांनी या दिवसाची आठवण करून दिली आहे.

काही काळानंतर त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि परिवाराला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी त्यांनी आपल्या ट्वीटरमध्ये रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांचाही उल्लेख केला आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा विकास होईल याची खात्रीही त्यांनी दिली. तुम्ही नेहमी महाराष्ट्राच्या भल्याचा विचार करता असं म्हणतं उद्धव ठाकरेंचही कौतुक केलं आहे.


error: Content is protected !!