मतदान ओळखपत्र नसेल तर पर्याय काय?कसे करणार मतदान
कोरोना जीवेघण्या संसर्गानंतर आता राज्यात पहिल्यांदाच राज्यात पार पडणार आहेत. राज्यात आगामी काळात पालिका निवडणुका आणि ग्रामपंचायत निवडणुकांमुळे राजकीय वातावरणही तापलं आहे. अशात राज्यातील 34 जिल्ह्यांमधील 14 हजार 234 ग्रामपंचायत निवडणुका पार पडत आहेत. या ग्रामपंचायत निवडणुकांसाठी आज (15 जानेवारी) मतदान पार पडणार आहे. सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर, 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी होणार आहे.
मतदानाचा हक्क बजावताना तुमच्याकडे निवडणूक आयोगाने मतदान ओळखपत्र अर्थात व्होटर आयडी (voter id) आवश्यक आहे. मात्र ते जर (voter id) तुमच्याकडे नसेल तरीही तुम्हाला मतदान करता येईल, पण त्याऐवजी दुसरं अधिकृत ओळखपत्र आवश्यक असेल.
मतदान करण्यासाठी मतदाराचे नाव मतदार यादीत असणे गरजेचे आहे. त्याशिवाय मतदान करता येणार नाही. निवडणूक आयोगाच्या ओळखपत्राशिवाय अन्य 11 प्रकारच्या ओळखपत्रांपैकी कोणतेही एक ओळखपत्र दाखवून मतदान करता येईल.
मतदान ओळखपत्र नसेल तर पर्याय काय?
– पासपोर्ट
– वाहन चालक परवाना
– छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (केंद्र, राज्य शासन, सार्वजनिक उपक्रम
– सार्वजनिक मर्यादित कंपनीने कर्मचाऱ्यांना दिलेले ओळखपत्र)
– छायाचित्र असलेले बँकेचे पासबुक
– पॅनकार्ड, NPR अंतर्गत RGI कडून मिळालेले स्मार्ट कार्ड
– मनरेगा कार्यक्रमपत्रिका
– कामगार मंत्रालयाद्वारे देण्यात आलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड
– छायाचित्र असेलेल निवृत्तीवेतन दस्तावेज
– खासदार, आमदार यांच्याकडून देण्यात आलेले ओळखपत्र
– आधारकार्ड