बीड जिल्ह्यात आज 38 कोरोना पॉझिटिव्ह तर 57 कोरोनामुक्त

आज प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 566 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 38 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 528 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

आज दि 7 रोजी आलेल्या अहवालात

अंबाजोगाई 3,आष्टी 9,बीड 8,धारूर 2 ,गेवराई 3,केज 3 माजलगाव 5 परळी 1,शिरूर 1, वडवणी 1 रूग्ण सापडले आहेत.

कालपर्यंत जिल्ह्यातील कोरोना बाधीत आकडा 15910 असून 14966 जण कोरोनामुक्त झाले आहेत काल 57 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे सध्या 440 रुग्ण उपचार घेत असून आतापर्यत 501 जणांचा मृत्यू झाला आहे


error: Content is protected !!