सुखद बातमी:भारताच्या पहिल्या स्वदेशी लसीला आपत्कालीन वापरास मंजुरी

नवी दिल्ली, 02 जानेवारी : भारतासाठी सर्वात मोठी बातमी आहे. कोरोना लशीच्या (corona vaccine) आपात्कालीन वापराला (emergency use) मंजुरी मिळाली आहे. मेड इन इंडिया कोरोना लस COVAXIN ला परवानगी देण्यात आली आहे. ही पहिली स्वदेशी लस आहे जिच्या आपात्कालीन वापराला मंजुरी देण्यात आली आहे.

हैदराबादच्या भारत बायोटेकनं (bjarat biotech) तयार केलेली ही लस. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेनं (Central Drugs Standards Control Organisation) च्या तज्ज्ञांच्या समितीनं भारत बायोटेकच्या कोवॅक्सिला एमर्जन्सी युझसाठी परवानगी दिली आहे. या समितीनं आता DCGI कडे शिफारस केली आहे.


error: Content is protected !!