इन्कम टॅक्स भरण्याबाबत अर्थमंत्रालयाने मुदतवाढी बाबत दिला नवा आदेश

घाबरू नका ITR साठी मिळाला मोठा दिलासा:10 जानेवारी शेवटची तारीख

नवी दिल्ली | आयकर परतावा भरण्यास 31 डिसेंबर शेवटची तारीख असल्याने सर्व्हरवर तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे आयटीआर रिटर्न फायलिंगना मुदतवाढीचा मागणी केंद्र सरकारकडे होत होती.

केंद्र सरकारने या मागणीला दाद देत मुदतवाढ दिला आहे. केंद्र सरकारने 12 दिवसांची मुदतवाढ दिली असून 10 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अर्थमंत्रालयाने यासंदर्भात घोषणा केली आहे.

ज्यांच्या खात्यांचे ऑडिट शिल्लक आहे त्यांना आणि त्यांच्या पार्टनरसाठी 2020-21 चा आयकर भरण्यासाठी 15 फेब्रुवारीची नवीन डेडलाईन देण्यात आली आहे. त्यासोबतच जीएसटी भरण्यासही 28 फेब्रुवारीपर्यंच मुदतवाढ देण्यात आली आहे.


error: Content is protected !!