महाराष्ट्रमुंबई

सरकारचा मोठा निर्णय:मिशन बिगीन अगेन’ची नियमावली आता 31 जानेवारीपर्यंत कायम

मुंबई, 30 डिसेंबर: ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या (Coronavirus) नव्या प्रकारानं आता देशातही शिरकाव केला आहे. देशात जवळपास 20 कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातही या कोरोनाचा भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav thackeray) सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारनं जाहीर केलेल्या ‘मिशन बिगीन अगेन’ची नियमावली (Mission Begin Again Guidelines) आता 31 जानेवारी 2021 पर्यंत कायम ठेवण्यात आली आहे.
राज्य शासनानं याबाबत आदेशही जारी केले आहेत.

तसेच आपत्कालीन सर्व नियमावली आधीच्या लागू राहतील, असं सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, 31 डिसेंबर नववर्ष स्वागत सर्वांनी केले पाहिजे. पण रात्री 11 नंतर हाॅटेल्स पब्स बंद राहील. मरीन ड्राईव्ह गेट वे ऑफ इंडिया येथे गर्दी करू नये, चार पेक्षा जास्त लोक एकत्रित आले तर कारवाई केली जाईल, असे निर्देश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत.

दुसरीकडे, ब्रिटनहून आलेल्या प्रवाशांपैकी काही प्रवाशांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले तर देशात नव्या स्ट्रेनचे काही रुग्ण सापडल्यानं केंद्र सरकारनं तातडीनं पावलं उचलत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.