माजीमंत्री क्षीरसागर यांच्या प्रयत्नामुळेच कोल्हारवाडी ते जिरेवाडी रस्त्याचा डीपीआर तयार:अंतिम मंजुरीची प्रतीक्षा-अरुण डाके
बीड- सोलापूर धुळे या राष्ट्रीय महामार्गाच्या कामानंतर बीड शहरातून जाणारा बारा किलोमीटरचा रस्ता स्वतंत्ररित्या करण्यात यावा यासाठी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी गेल्या तीन ते चार वर्षापासून सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे काही दिवसांपूर्वीच या रस्त्याचा डीपीआर पूर्णपणे तयार झाला आहे आता फक्त अंतिम मंजुरी राहिली आहे ती देखील लवकरच मिळणार असल्याची माहिती जेष्ठ नेते अरुण डाके यांनी दिली आहे
सोलापूर धुळे हा राष्ट्रीय महामार्ग झाल्यानंतर बीड शहराने मोकळा श्वास घेतला आहे मात्र बीड शहरातून कोलारवाडी ते जिरेवाडी,तसेच चौसाळा आणि गेवराई शहरातून जाणारा रस्ता रुंदीकरण करून पुन्हा नव्याने करण्यात यावा अशी मागणी केली होती
त्यानुसार ती मंजूरही झाली चौसाळा साठी 5 कोटी,गेवराई साठी 10 कोटी व बीड साठी 50 कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे तसेच या महामार्गाच्या दरम्यान चौसाळा बीड आणि गेवराई शहरातून जाणाऱ्या रस्त्यालगत असलेले स्लिप रोड आणि सर्व्हिस रोड तातडीने करण्यात यावेत यासाठी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी गेल्या तीन ते चार वर्षापासून सातत्याने पाठपुरावा केलेला आहे
औरंगाबाद नागपूर आणि दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची तीन वेळा भेट घेऊन या रस्त्याला मंजुरी मिळवली तसेच या रस्त्याचे काम तातडीने व्हावे यासाठी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी यांच्याशी वारंवार भेट घेऊन केली त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी या रस्त्याचा डीपीआर तयार करण्याचे आदेश दिले त्यानुसार हैदराबाद येथील एका कंपनीला हे काम देण्यात आले होते चौसाळा, गेवराई सह बीडच्या 12 किलोमीटर रस्त्याचा डीपीआर तयार झाला असून तो अंतिम मंजुरीसाठी दाखल करण्यात आला आहे लवकरच या रस्त्याचे कामही सुरू होणार असून हे काम होणार असल्याचे लक्षात आल्यामुळे या रस्त्याचे श्रेय मिळावे म्हणून काहीजण जाणीवपूर्वक प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे मात्र खऱ्या अर्थाने या रस्त्यासाठी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केलेला पाठपुरावा आणि वारंवार झालेल्या बैठका याबाबत जनतेलाही याची माहिती देण्यात आलेली आहे त्यामुळे विनाकारण श्रेय घेण्याचा कुणी प्रयत्न करू नये असे आवाहन ज्येष्ठ नेते अरुण डाके यांनी केले आहे