बीड जिल्ह्यात 16 हजार जणांनी केली कोरोनावर मात:आज 22 पॉझिटिव्ह

आता पर्यंत बीड जिल्ह्यात जवळपास 15871 रुग्णांनी कोरोना वर मात केली आहे एकूण 16647 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह होते आज 95.33%टक्के बरे होण्याचे प्रमाण आहे सध्या केवळ 241 रुग्ण उपचार घेत आहेत

आज प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 424 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 22 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 402 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

आज दि 28 रोजी आलेल्या अहवालात

अंबाजोगाई 2 आष्टी 4,बीड 7 गेवराई 2 माजलगाव 1,परळी 4,शिरूर 1,वडवणी 1,रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत.

काल 26 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत


error: Content is protected !!