राज्यात 5 हजार 292 पोलीस हवालदार पदांची भरती होणार-गृहमंत्री अनिल देशमुख
कोरोना संकटामुळे अर्थव्यवस्था कोलमडली असून बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, महाविकासा आघाडी सरकारने राज्यात 12 हजार 500 पोलिसांची भरती करण्याचा निर्णय घेतला होता. यांपैकी 5 हजार 292 पोलीस हवालदार (Police Constables) पदांची भरती करण्याचे आदेश लवकरच देण्यात येतील, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले आहेत. दरम्यान, त्यांनी नागपूरमधील गुन्हेगारीचा आलेखदेखील सर्वांसमोर मांडला आहे. त्यानुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत नागपूरमधील गुन्हेगारीत घट झाल्याचे समजत आहे.
राज्यात पोलीस हवालदार पदाची एकूण 12 हजार 500 पद भरली जाणार आहे.
यापैंकी पहिल्या टप्प्यात 5 हजार 295 पदे भरली जाणार आहे. यासंदर्भात युनिट कमांडर्सना आवश्यक आदेश दिले जातील. तसेच मुंबई पोलिसांच्या धर्तीवर महाराष्ट्राची दुसरी राजधानी असलेल्या नागपूरातही अश्वदल पोलीस युनिट सुरु केले जाणार आहे. तसेच सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना बॉडी कॅमेरे दिले जाणार आहे, असे अनिल देशमुख म्हणाले आहेत. कोरोनामुळे एकीकडे अर्थव्यवस्था कोलमडली असताना नोकरीच्या संधी कमी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय नोकरीची संधी शोधणाऱ्या राज्यातील तरुण-तरुणींना दिलासा देणारा आहे