मुंबईच्या गुणवंत बाबा चराटे प्रतिष्ठानच्यावतीने सात जणांना सेवा पुरस्कार:बीडचे सहा जण सन्मानित

जेष्ठ पत्रकार महेश वाघमारे, डॉ दिवाकर गुळजकर सन्मानित

बीड
श्री सेवा सम्राट गुणवंत बाबा सराटे यांच्या 28 व्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिष्ठानच्या वतीने यावर्षी बीड येथील सहा व नाशिक येथील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सात मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आशीर्वाद लॉन्स या सभागृहात शनिवारी सायंकाळी या पुरस्काराचे वितरण महंत आचार्य अमृत महाराज जोशी यांच्या सह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले

राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या बरोबर राहून अविरतपणे जनसेवा करणाऱ्या श्री सेवा सम्राट गुणवंत बाबा चराटे यांच्या 28 व्या पुण्यतिथीनिमित्त चराटे प्रतिष्ठानच्या वतीने यावर्षी सात मान्यवरांना सेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे गुणवंत बाबा चराटे यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी मुंबई या ठिकाणी विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार दिले जातात मात्र यावर्षी आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज यांच्या पुढाकाराने यावर्षी बीड येथील ह भ प हरिदास जोगदंड, ज्येष्ठ पत्रकार महेश वाघमारे, शिक्षण क्षेत्रातील पल्लवी प्रशांत देशपांडे उद्योग व्यापार क्षेत्रातील नितीन कोटेचा या सामाजिक क्षेत्रातील बब्रुवान शेंडगे पाटील, नाशिक येथिल धार्मिक क्षेत्रात ज्योतिषाचार्य दिगंबर घनश्याम जोशी आणि वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉ दिवाकर गूळजकर या सात जणांना आज आशीर्वाद लॉन्स याठिकाणी झालेल्या एका भव्य कार्यक्रमात पुरस्काराचे वितरण करण्यात आले

या कार्यक्रमासाठी विधानपरिषदेचे आ विनायक मेटे, भाजपाचे ज्येष्ठ सदस्य पंजाबराव मस्के, ज्येष्ठ संपादक नामदेवराव क्षीरसागर, शिवाजीराव देसाई,झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठानचे गौतम खटोड, उपाध्यक्ष हेमंत क्षीरसागर,अरुण डाके, व प्रतिष्ठानचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते याच कार्यक्रमात स्वामी मधुरानंद सरस्वती यांना देखील सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे महामंडलेश्वर ईश्वरदासजी महाराज यांनी सेवा सम्राट गुणवंत बाबा प्रतिष्ठानच्या कार्याबाबत माहिती दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधव चाटे यांनी केले

यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून प्रतिष्ठानने बीडला कार्यक्रम घेऊन बीडच्या योग्य व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरवले त्याबद्दल धन्यवाद दिले तर सर्व पुरस्कार प्राप्त व्यक्तीच्या वतीने जेष्ठ पत्रकार महेश वाघमारे यांनीही प्रतिष्ठानचे आभार मानले


error: Content is protected !!