बीडच्या पाणी पुरवठा योजनेसाठी अतिरिक्त विद्युतभार मंजुरीसाठी क्षीरसागर बंधूंनी घेतली ऊर्जा मंत्र्यांची भेट
दूध संघाला नवीन योजनेसाठी 5 कोटी 74 लाखाचा निधी वर्ग करावा:दुग्ध विकास मंत्री केदार यांच्याकडे मागणी
बीड
अमृत अभियान अंतर्गत सुधारित पाणीपुरवठा योजनेसाठी अतिरिक्त विद्युतभार मंजूर करावा शहरात पाचवी तार स्वतंत्र देऊन पथदिव्यांची व्यवस्था करावी तसेच अतिरिक्त ट्रांसफार्मर देण्यात यावेत यासाठी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी आज मंत्रालयात राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची भेट घेऊन ही मागणी केली आहे तसेच बीड तालुका दूध संघाला केंद्र सरकारकडून मंजूर झालेला पाच कोटी 74 लाखाचा निधी वर्ग करून राज्य शासन व महासंघाच्या माध्यमातून मंजूर योजना कार्यान्वित करावी अशी मागणी राज्याचे दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांची भेट घेऊन केली आहे या दोन्ही मंत्र्यांच्या झालेल्या भेटीमुळे बीड शहराचा वीज प्रश्न आणि स्वच्छ व निर्भेळ दूध उत्पादन योजनेचा प्रश्न मार्गी लागणार आहे
बीड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अमृत अभियान अंतर्गत सुधारित बीड पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे बीड शहरात पाणीपुरवठा करण्यासाठी पिंपळगाव मांजरा व काडीवडगाव तालुका माजलगाव या ठिकाणी पम्पिंग स्टेशन उभारण्यात आले आहे नवीन योजनेअंतर्गत सदरील ठिकाणी नवीन पंप बसवण्याचे प्रस्तावित आहे
याकरता अतिरिक्त विद्युतभार मंजुरीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण बीड यांनी वीज वितरण विभागाला प्रस्ताव दाखल केलेला आहे परंतु महावितरण’कडून अतिरिक्त विद्युत् भार मंजुरीसाठी थकबाकी भरण्याची कारवाई करावी असे कळवले आहे मात्र थकबाकी भरणे नगरपरिषदेचे शक्य होणार नाही covid-19 मुळे नगरपालिकेची वसुली सुद्धा सध्या ठप्प आहे
ही बाकी भरण्यासाठी व उपाय योजनेसाठी शासन स्तरावर विचार सुरू असून ती भरण्यात येईल मात्र अमृत पाणीपुरवठा योजना ही शहरासाठी महत्त्वाकांक्षी योजना असून त्यामुळे शहरात वेळेवर पाणीपुरवठा होईल सध्याचे चालू वीज देयके नगर परिषदे मार्फत वेळोवेळी आधार करण्यात येत असून नवीन प्रस्तावित योजनेतील पंपिंग मशीन व आवश्यक साहित्य अतिरिक्त विद्युत भार मंजूर नसल्यामुळे सध्या बसवणे शक्य नाही तसेच सौर उर्जा प्रकल्पाचे ही काम यामुळे रखडले आहे बीड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या या योजनेसाठी अतिरिक्त विद्युत भार मंजूर करावा तसेच बीड शहरातील पथदिव्यांसाठी जुन्या पद्धतीप्रमाणे चार तारां वरच कनेक्शन दिले गेले आहे मात्र यासाठी स्वतंत्र पाचवी तार बसवल्यास मोठी सोय होणार आहे त्यासही मंजुरी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली
त्याचबरोबर आज मंत्रालयात दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांची भेट घेऊन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी बीड तालुका दूध संघाला केंद्र सरकारकडून पाच कोटी 74 लाखाचा राष्ट्रीय दुग्ध विकास योजनेअंतर्गत निधी मंजूर झाला असून यामध्ये बलकुलर म्हणजेच दूध शीतकरण यंत्र दूध तपासणी यंत्र खरेदी करता येणार आहे यामुळे दुधाची गुणवत्ता व प्रतवारी ठरणार असून स्वच्छ व निर्भेळ दूध उत्पादन शक्य होणार आहे राज्य शासन व महासंघाच्या माध्यमातून ही योजना कार्यान्वित केली जाणार असून यामध्ये 60 लाख रुपयांचा निधी दूध संघ स्वतः भरणार असून हा निधी दूध संघाला वर्ग करून योजना कार्यान्वित करावी अशी मागणी क्षीरसागर बंधूंनी मंत्र्यांकडे केली आहे आज मंत्रालयात दोन विभागांच्या मंत्र्यांची भेट घेऊन क्षीरसागर बंधूंनी अनेक प्रश्नांची उकल केली लवकरात हा निधी प्राप्त होईल व योजना कार्यान्वित होणार आहे