ब्रेकिंग न्यूज ; बाभळदरा तांडा येथील युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

गेवराई शहरातील कोविड सेंटर मध्ये कॉरंटाईन होता युवक

गेवराई शहरातील न.प.च्या छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक सभागृह येथे कोरंटाईन असलेल्या व्यक्ती ने या कक्षातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी रोजी रात्री 9:30 च्या सुमारास घडली असून या घटनेने शहरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. गेवराई शहरातील कोविड सेंटर मध्ये कोरंटाईन असलेल्या तुकाराम जगन्नाथ जाधव वय 35 रा.बाभळदरा तांडा चकलांबा. यांना गेल्या तीन ते चार दिवसापासून गेवराई शहरातील नगरपरिषदेच्या कोविड सेंटर मध्ये कोरंटाईन करण्यात आले होते. त्याचा स्वब शुक्रवार रोजी घेण्यात आला असून त्याचा अहवाल येण्या आधीच त्याने कोरंटाईन सेंटर मधील पंख्याला रुमालाच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. रात्री न.प.कर्मचऱ्याने त्याचा जेवणाचा डब्बा देण्यासाठी दार वाजवले असता न उघडल्याने कर्मचाऱ्यांनी बाहेरून खिडकीत डोकावून पहिले असता त्यांना गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलीस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पुरषोत्तम चोबे यांनी भेट दिली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!