तब्बल 40 दिवस बॅटरी बॅकअप असणारा नवा स्मार्टफोन लॉन्च:किंमतही कमीच

भारतात स्मार्टफोन्सची वाढती मागणी पाहता अनेक बड्या कंपन्या बजेट स्मार्टफोन लॉन्च करत आहेत. टेक्नो कंपनीने देखील आपला नवा Tecno Spark 6 Go हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनची बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर स्टँडबाय मोडवर तब्बल 40 दिवस चालते असा दावा कंपनीने केला आहे.

Tecno Spark 6 Go हा स्मार्टफोन 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरोजसह लॉन्च करण्यात आला आहे. निळ्या, मोरपंखी आणि चंदेरी रंगात हा फोन ग्राहकांना उपलब्ध असणार आहे. तसेच सध्या सुरू असलेल्या एका खास ऑफरमुळे तुम्हाला 200 रुपयांचा फायदाही होऊ शकतो.

25 डिसेंबरपासून विक्री सुरू

Tecno Spark 6 Go हा फोन स्टँडबाय मोडमध्ये 40 दिवस राहू शकतो आणि एकदा चार्ज केल्यावर सलग 54 तास यावर संभाषण करू शकतो असा दावा कंपनीने केला आहे.
दरम्यान, फ्लिपकार्टवर या फोनची विक्री 25 डिसेंबरपासून दुपारी 12 वाजता सुरू होणार आहे. 7 जानेवारीपासून तुम्ही ऑफलाईन स्टोरमध्ये या फोनची खरेदी करू शकता.
फिचर्स

  • 6.52 इंचाचा HD+ TFT डिस्प्ले
  • स्क्रीन रिजॉल्यूशन 720×1600 पिक्सल
  • डुअल रियर कॅमेरा सेटअप
  • 13 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा
  • 5000 mAh ची बॅटरी

किंमत

Tecno Spark 6 Go फोनची किंमत खिशाला परवडणारी आहे. 4 GB RAM + 64 GB स्टोरेजचा हा फोन 8 हजार 696 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.


error: Content is protected !!