पुण्यात बावधन परिसरात पुन्हा एकदा गवा आढळला: रेस्क्यू ऑपरेशन सुरू

पुणे: पुण्यात पुन्हा एकदा गवा दिसून आला आहे. बावधन परिसरात गव्याचे दर्शन झाले आहे. वनविभागाचे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले असून, रेस्क्यू ऑपरेशन केले जात आहे. हा गवा जवळच डोंगर आणि जंगल परिसर असल्याने तेथून बावधन परिसरात आला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

१३ दिवसापूर्वीच ९ डिसेंबरला कोथरूड परिसरात आलेल्या गव्याला रेस्क्यू करताना उपचारा दरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

९ डिसेंबर रोजी पुण्यातील कोथरूड परिसरात गवा दिसला होता. या गव्याला पकडण्यासाठी वनविभाग आणि पोलिसांनी प्रयत्न केले. काही तासांच्या अथक प्रयत्नानंतर गव्याला पकडण्यात यश आले होते. मात्र, थोड्या वेळातच गव्याचा मृत्यू झाला होता.आता दुसऱ्यांदा गव्याचं दर्शन झालं आहे. या गव्याला पकडण्याचे आव्हान वनविभागासमोर आहे. नागरिकांनी गव्याला बघण्यासाठी गर्दी करू नये, असे आवाहन केले जात आहे.


error: Content is protected !!