आता ऍसीड हल्ला,बलात्काराच्या गुन्ह्यात मृत्युदंडाची शिक्षा:विधेयक दाखल

महिला व बालकांवरील अत्याचाराच्या विरोधातील शक्ती विधेयक आज विधानसभेत मांडण्यात आले. यामध्ये 21 दिवसांमध्ये खटल्याचा निकाल, बलात्कार, ऑसिड हल्ला आणि बालकांवरील अत्याचारांच्या गंभीर गुह्यांमध्ये मृत्युदंडांची तरतूद केली आहे. या विधेयकावर सकारात्मक चर्चा होऊन लवकरच मंजूर होईल असा विश्वास यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केला.

महिला व बालकांवरील अत्याचारांना आळा घालण्यासाठी शक्ती विधेयक हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच विधानसभेत सादर करण्यात आले. या विधेयकात बलात्कार, ऑसिड हल्ला आणि समाजमाध्यमातून महिला आणि बालकांबद्दल आक्षेपार्ह मजपूर आणि छायाचित्र याबद्दल मृत्युदंड आणि 10 लाख रुपयांपर्यंतची दंडाची तरतूद आहे.
या विधेयकामध्ये अशा प्रकारच्या गुह्यात 15 दिवसांत गुह्याचा तपास आणि आरोपपत्र दाखल करावे आणि आरोपपत्र दाखल झाल्यावर 30 दिवसांत सुनावणी पूर्ण व्हावी अशी तरतूद आहे.

महाराष्ट्र शक्ती क्रिमिनल लॉ (महाराष्ट्र अमेंडमेंट) अॅक्ट 2020 आणि स्पेशल कोर्ट अॅडमशिनरी फॉर इंप्लिमेंटेशन ऑफ महाराष्ट्र शक्ती क्रिमिनल लॉ 2020 अशी दोन विधेयके विधिमंडळात पटलावर ठेवण्यात आली आहेत.

महिला व बालकांवरील अत्याचारांना आळा घालण्यासाठी शक्ती विधेयक विधानसभेत सादर केले. यावर चर्चा होईल. या कायद्याच्या माध्यमातून सबळ पुरावा मिळाल्यावर दोषींवर कारवाई व्हावी हा उद्देश आहे. म्हणून या विधेयकाला मंजुरी मिळण्यासाठी विनंती करून त्यासाठी प्रयत्न करू.

  • अनिल देशमुख, गृहमंत्री

काही महत्त्वाच्या तरतुदी

  • विश्वासू किंवा जवळच्या व्यक्तीने बलात्कार केल्यास मृत्युदंड
  • 16 वर्षांखालील मुलीवर बलात्कार केल्यास मृत्युदंड
  • सामूहिक बलात्कार-मृत्युदंड
  • 16 वर्षांच्या खालील मुलीवर सामूहिक बलात्कार-मृत्युदंड


error: Content is protected !!