शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षेसाठी ऑनलाइन अर्जाची 20 डिसेंबरपर्यंत मुदत

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2021 मध्ये घेण्यात येणार आहे. यासाठी नियमित शुल्कासह ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी 20 डिसेंबरपर्यंत मुदत आहे.

जानेवारी ते मार्च 2020 या सत्रासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश दिलेल्या व जुलै ते सप्टेंबर 2020 या सत्रातील नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन त्यांची ऑनलाइन नोंदणी परिषदेच्या संकेतस्थळावर झालेली असणे आवश्‍यक आहे.

परीक्षेसाठी पूर्वअटी पूर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांनाच परीक्षा अर्ज भरता येणार आहे. शासनमान्य संगणक टायपिंग प्रशिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परिषदेच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या लिंकवर संस्था लॉगिनद्वारे ऑनलाइनद्वारे भरणे आवश्‍यक आहे.

चलनाद्वारे किंवा ऑफलाइन पद्धतीने शुल्क भरू नये. ऑनलाइन पद्धतीने शुल्क भरून चलन अपडेट झाल्याशिवाय परीक्षा अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होणार नाही. विलंब शुल्कासह 21 ते 25 डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे.

अतिविलंब शुल्कासह 26 ते 30 डिसेंबरदरम्यान अर्ज भरण्यासाठी सुविधा उपलब्ध आहे, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्‍त तुकाराम सुपे यांनी स्पष्ट केले.


error: Content is protected !!