बीड

आज 29 अहवालाची प्रतीक्षा;गेवराई माजलगाव तालुक्यात आरोग्य पथक रवाना

गेवराई-माजलगाव तालुक्यात आरोग्य सर्वेक्षण पथक दाखल


बीड
काल बीड जिल्ह्यात दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर जिल्हा प्रशासनाने आढळून आलेल्या परिसरात कडक संचारबंदी लागू केली असून या परिसरातील नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षण करण्यासाठी पथक पाठवले आहे तर जिल्हा रुग्णालयातून 27 आणि केज येथून दोन असे 29 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवले असल्याची माहिती मिळाली आहे


गेवराई तालुक्यातील इटकूर येथील कंटेंनमेंट झोनमधील गावांत १४ पथकांद्वारे८५० घरांतील ४ हजार ७०० नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षण करण्यात येणार आहे तर
माजलगाव तालुक्यातील हिवरा कंटेनमेंट झोनमधील गावांत ०७ पथकांकडून ८५० कुटुंबातील ३ हजार नागरिकांचे सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे बीड रुग्णालयातून २७ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.तर अंबाजोगाई रुग्णालयातून केेज तालुक्यातील दोन संशयितांचे स्वॅब पाठवले आहेत.आज एकूण २९ स्वॅबच्या अहवालाची प्रतिक्षा आहे.जिल्हा आरोग्य विभागाकडून ही माहिती दिली गेली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *