जीओची ५ जी सेवा २०२१च्या मध्यावर लॉन्च होणार:भारतात डिजिटल परिवर्तन
रिलायन्स जीओची ५जी सेवा २०२१च्या मध्यावर लान्ज करणार असल्याचे रिलायन्स इंडस्ट्रिचे चेअरमन आणि मॅनेजर डायरेक्टर मुकेश अंबानी यांनी सांगितले. इंडिया मोबाईल काँग्रेसच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही माहिती दिली. भारताचे डिजिटल स्वरूपात रूपांतर करण्यासाठी देशात ५ जी सेवांचा उदय झाला आहे. देशात २०२१च्या मध्यापर्यत देशात ५ जी सेवा सुरू होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. २०२०च्या सभेत जिओ ५जीची औपचारिक घोषणा करण्यात आली होती. भारतात डिजिटल परिवर्तनासाठी जिओ ५जीचे कायमस्वरूपी योगदान असणार आहे, असे मुकेश अंबानी यांनी सांगितले.
५जी सेवा लवकरात लवकर रोलआउट करण्याची घोषणा केली आहे. त्याचप्रमाणे ५जीच्या पॉलिसी लेवलवर काम करण्याचेही त्यांनी सांगितले आहे
अंबानींनी ५जी सेवा अफोर्डेबल ठेवण्यावर लक्ष दिले आहे. त्यामुळे ५जी सेवा देशातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचले. मुकेश अंबानी यांनी असे आश्वासन दिले आहे, की रिलायन्स जिओचे हे ५जी नेटवर्क पूर्णपणे स्वदेशी असणार आहे. यातील हार्डवेअर आणि टेक्नलॉजी भारत सरकारच्या निर्देशानुसार तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ५जी नेटवर्क हे आत्मरिर्भर भारतासाठी एक मैलाचा दगड ठरेल असे ते म्हणाले.