ऑनलाइन वृत्तसेवा

राज्यात 2 हजार 212 शिक्षक व 682 कर्मचारी करोनाबाधित

राज्यातील इयत्ता नववी ते बारावीच्या शाळांमधील शिक्षक व कर्मचाऱ्यांची करोना चाचणी बंधनकारक केली आहे. यात 2 हजार 212 शिक्षक व 682 कर्मचारी करोनाबाधित सापडले आहेत.

करोनामुळे गेले आठ महिने शाळा बंद होत्या. मात्र, अनलॉक प्रक्रियेदरम्यान नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. त्यानुसार त्यापूर्वी शिक्षक, कर्मचाऱ्यांनी करोना चाचणी करून घेण्याचे बंधन घातले होते. राज्यात 2 लाख 27 हजार 775 शिक्षक आणि 92 हजार 343 शिक्षकेतर कर्मचारी आहेत.

यातील आतापर्यंत 1 लाख 51 हजार 539 शिक्षकांनी, तर 56 हजार 34 कर्मचाऱ्यांनी करोना चाचणी करून घेतली आहे.