विदेशवृत्तसेवा

7 डिसेंबरपासून या लशीची डिलीव्हरी सुरू:आंतरराष्ट्रीय बाजारात डिसेंबर महिन्यातच लसीकरणास सुरूवात

भारतात कोरोना लसीची चाचणी अंतिम टप्प्यात आहे तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात डिसेंबर महिन्यातच लसीकरणास सुरूवात होण्याची चिन्हे आहेत. ब्रिटनची तयारी पाहता फायझर आणि बायोएनटेकच्या लसीला सर्वात आधी मंजुरी मिळून 7 डिसेंबरपासून या लशीची डिलीव्हरी सुरू होईल. अमेरिकेच्या एफडीएची एक बैठकही 10 डिसेंबरला होणार असून या बैठकीत लशीला तातडीची मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

ब्रिटनच्या लसीला तातडीने मंजुरी

ब्लूमबर्गच्या एका रिपोर्टनुसार ब्रिटनने लसीला तातडीने मंजुरी मिळण्याची योजना आखली आहे. आतापर्यत केवळ चीन आणि रूसने स्वनिर्मित लसीकरणास मंजुरी दिली आहे.
ब्रिटन सरकारच्यामते नाताळच्या आधीच लसीकरणाची मोहीम सुरू करण्यात येईल. ब्रिटनच्या ड्रग्स रेग्युलेटर मेडिसीन्स अॅण्ड हेल्थकेअर प्रॉडक्ट्स रेग्युलेटरी एजन्सीने स्पष्ट केले की, लोकांच्या आरोग्याला प्राधान्य देऊनच कमीत कमी वेळात लसीला मंजुरी देण्याचा प्रयत्न असेल.

अमेरिकेत डिसेंबरमध्ये लसीकरणास सुरुवात

अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ अॅलर्जी अॅण्ड इंफेक्शियस डिसीजचे प्रमुख अँथनी फाँसी यांनी सांगितले, ‘डिसेंबर महिना संपायच्या आतच लसीकरण सुरू करण्यात येईल. फायझर आणि बायोएनटेकच्या वॅक्सिन कौडिडेट BNT162b2 ने अंतिम टप्प्यातील चाचणीनंतर लस 95 टक्के प्रभावी असल्याचा दावा केला आहे. याआधी अमेरिकेच्या मॉडर्ना कंपनीने लस 94.5 टक्के प्रभावी असल्याचा दावा केला आहे.

जर्मनीमध्ये 15 डिसेंबरच्या आत लसीकरण

जर्मनीच्या अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार युरोपीय संघाच्या रेग्युलेटरीकडून मंजुरी मिळाल्यानंतर डिसेंबरमध्येच लसीकरणास सुरूवात होणार आहे. जर्मनीचे आरोग्यमंञी बावरियन रेडिओ यांनी 15 डिसेंबरच्या आतच फायझरच्या लसीला मंजुरी मिळेल असे स्पष्ट केले आहे.

आतापर्यंत फायझर-बायोएनटेक, मॉडर्ना, रूसची स्पूतनिक व्ही आणि ऑक्सफोर्ड युनिर्व्हसिटी-एस्ट्राजेनेकाच्या लसीच्या फेज 3 चे निकाल समोर आले आहे.
फायानाशिअल्स टाइम्सच्या वृत्तानुसार युरोपियन मेडिसिन्स एजन्सी पुढील आठवडय़ातच फायझर-बायोटेक आणि मॉडर्नाच्या लसीला मंजुरी देण्याची शक्यता आहे.
लशीला मंजुरी मिळाल्यास युरोपीय संघाच्या 27 सदस्य देशांमध्ये डिसेंबरमध्येच लसीकरण सुरू होईल.
ब्रिटनने 35 कोटी लस खरेदी करण्याचा सहमती दर्शवली आहे.