विना PUC गाडी चालवताना पकडल्यास नोंदणी प्रमाणपत्रच (RC) होणार रद्द:वाचा नवीन नियम

नवी दिल्ली । आता विना PUC (प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्रा) गाडी चालवताना पकडल्यास तुमच्या गाडीचं नोंदणी प्रमाणपत्रच (RC) रद्द होऊ शकतं. सरकारने मोटर व्हेईकल अॅक्टमध्ये काही नव्या तरतुदी केल्या आहेत. यानुसार प्रदुषण रोखण्यासाठी PUC चं काटेकोर पालन होणं आवश्यक मानलं जात आहे (No PUC certificate can lead to seizure of vehicle RC from next year).

नियम भंग केल्यास आरसी बूक जप्त होणार
रस्ता परिवहन मंत्रालयाने अधिसूचना जारी करत म्हटलं आहे, ‘वाहन चालकाकडे वैध प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र नसल्यास पुढील वर्षी जानेवारीपासून वाहनाचं आरसी बूक जप्त करण्यात येईल.
याबाबत रस्ता परिवहन मंत्रालयाने पीयूसीची प्रक्रिया ऑनलाईन करण्याआधी यावर सूचना मागवल्या आहेत. तसेच ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी 2 महिन्यांचा कालावधी लागेल असंही म्हटलं आहे.

7 दिवसात आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न केल्यास कठोर कारवाई


तपासणी करताना वाहन चालकाकडे वैध पीयूसी प्रमाणपत्र नसेल तर संबंधिताला हे कागदपत्रं सादर करण्यासाठी 7 दिवसांचा वेळ मिळेल. या वेळेतही गाडी मालकाने पीयूसी सादर केलं नाही, तर गाडीचं आरसी बूक जप्त करण्यात येईल. याशिवाय 7 दिवसात पीयूसी नुकतणीकरण देखील करावं लागेल. विशेष म्हणजे पीयूसीसाठी लवकरच एक क्यूआर कोड सिस्टम लागू करण्यात येणार आहे. यात गाडीच्या मालकाचं नाव, नोंदणी क्रमांक आदी सर्व गाडीचे कागदपत्र आणि माहिती असेल.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय देशभरात सर्व वाहनांसाठी एक प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पीयूसी) प्रणाली लागू करण्याच्या विचारात आहे. ‘पीयूसी’ प्रमाणपत्राबरोबर ‘क्यूआर कोड’ देण्यात येणार असून, त्यामध्ये वाहनासंदर्भात महत्त्वाची माहिती असेल. वाहतूक मंत्रालयाने प्रस्ताव सादर केला असून, हरकती आणि सूचना मागितल्या आहेत.


error: Content is protected !!