आनंदवन येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ.शीतल आमटे यांची आत्महत्या

चंद्रपूर, 30 नोव्हेंबर : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि महारोगी सेवा समितीच्या CEO डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आनंदवन येथील राहत्या घरी विष घेवून शीतल आमटे यांनी जीवन यात्रा संपवली आहे.

डॉ.शीतल आमटे यांनी आज सकाळी आनंदवन येथील आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली आहे. शीतल आमटे यांच्या आत्महत्येमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शीतल आमटे यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे.

काही दिवसांपूर्वी शीतल आमटे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून महारोगी सेवा समितीच्या लोकांवर गंभीर आरोप केले होते.


error: Content is protected !!