आष्टीबीड

बिबट्याला जेरबंद करण्यासाठी सतरा पथके स्थापन

बीड, (जिमाका) दि. २८::-सुरुडी व किनी येथे मानवी हल्ला केलेल्या बिबट्यास शोधून जेरबंद करण्यासाठी वनविभागाच्या एकूण सतरा टीम स्थापन झालेल्या असून त्यामध्ये औरंगाबाद ,अमरावती ,नांदेड व इतर 1 अशा एकूण चार वन्यजीव व्यवस्थापनामध्ये तज्ञ असणाऱ्या टीमचा ही समावेश असून एकूण ८० कर्मचारी यात सक्रीय आहेत तसेच आजूबाजूच्या गावामध्ये या टीमद्वारे पेट्रोलिंग करून बिबट्याचा मागोवा घेण्याचे व सुरक्षितता बाळगण्यासाठी प्रबोधन करण्याचे काम सुरू असून , सहा पिंजरे बिबट्याला जेरबंद करण्यासाठी लावले आहेत. उद्या आणखी दोन पिंजरे लावण्यात येणार आहेत. लवकरच यशस्वीपणे जेरबंद करू असा विश्वास वनविभागाने व्यक्त केला आहे